| सांदोशी गाव |
महाराष्ट्राला लाभलेली सहयाद्रीची रांग हा आपला पाठीराखा आहे. त्याच्या आसमांतात असणारे घाटमार्ग हे २००० साल पूर्वीचे व्यापारी मार्ग होते . अश्याच एका व्यापारी मार्गावर असलेले सांदोशी हे गाव. २००० साल पूर्वी सहयाद्रीच्या रांगेमध्ये देशातून कोकणात उतारण्यासाठी चार वाटा प्रसिद्धा होत्या. त्यातली एक वाट म्हणजे कावळे बावळे खिंडीची वाट. सांदोशीमधून रायगडाला जाण्यासाठी सांदोशीतील लोक कावळे बावळे खिंडीचा वापर करतात.
सांदोशीला एक मोठा ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. गावात होळीचा माळ असलेल्या ठिकाणी जवळच शिवकालीन सतिशीळा ,विरगळी आहेत. हे सर्व ऐतिहासिक पुरावे असलेले साहित्य गावाने तिथे जतन केले आहे.
हे गाव एका छोट्या टेकडीवर वसले आहे. गावात प्रवेश केल्यावर गावदेवीचे मंदिर आहे. निसर्गरम्य वातावरण असलेले सांदोशी हे गाव खूप सुंदर आहे. सांदोशी गावात उभे राहून रायगड चे आपल्याला दर्शन होते. पावसाळ्यात धबधबे , ओढ़े , नदया आणि सर्वत्र हिरवी झाडे आपल्याला आनंद देतात. आजही या गावात दगड , मातीची जूनी कौलारु घरे पाहायला मिळतात. शहराच्या गर्दीतून लांब असलेले आणि रायगडच्या पायथ्याशी असलेले हे गाव आपल्याला पाहण्यासारखे आहे.
सांदोशी गावात गणपती उत्सव आणि होळी आजही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. बाला नाच येथे खूप प्रसिद्ध आहे. महाड तालुका आणि रायगड जिल्हा असणारे हे गाव खूप रम्य आहे.
सांदोशी गावात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तेथे भाताची आणि नाचणीची शेती केली जाते. तसेच वैशाखात तेथे मोठ्या प्रमाणात आंबे, जांभूळ, फणस,काजू, करवंद पहायला मिळतात. गावाच्या वर घनदाट जंगल आहे. तिथे वाघ, लांडगे, मोर, ससा, हरिण हे प्राणी आढळतात.
रायगड किल्याच्या समोरच उंच शिखर म्हणजे कोकण दिवा होय. कोकणदिवा हा सह्याद्री पर्वत रांगांमध्ये स्तित आहे. ह्याच कोकण दिव्याला एक मोठा इतिहास आहे. शिवकाळात हा टेहळणी बुरुज म्हणून ओळखला जायचा. पूर्वीचा हा कोकणातून देशावर जाण्याचा व्यापारी मार्ग होता. सध्या युवकांमध्ये प्रसिद्ध असा ट्रेक पॉइंट आहे. काळा सोबत ट्रैकर्सची वर्दळ सध्या वाढली आहे. सांदोशी गावातून दोन अडीज तासात पाई आपण कड्यावरती पोहोचतो. असे हे सांदोशी गाव निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे.
------ समस्त सर्कले नाईक परिवार ,सांदोशी..रायगड।।